Tuesday, September 15, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

पंतप्रधानांचा ताफा निदर्शकांनी रोखला; दिल्लीला सुखरूप पोहोचल्याने पंतप्रधानांनी मानले धन्यवाद 

चंदीगड : आज पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा निदर्शकांनी रोखला. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा तब्बल 20 मिनिटे रस्त्यावर थांबवण्यात आला अन् शेवटी सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करून पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले. अशा प्रकारे पंतप्रधानांचा ताफा रोखण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे केंद्र आणि पंजाब राज्य सरकारमधील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंतपणे दिल्लीला जाऊ शकलो, असा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांना दिल्याची माहिती आहे.

 

कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या दौऱ्यात सहभागी होणार होते. आज फिरोजपूरमध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते. मात्र, या प्रकारामुळे मोदी यांचा पंजाब दौरा रद्द करण्यात आला आहे. या प्रकारामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला जाब विचारला असून चौकशी अहवाल मागवला आहे.

फोटो – https://twitter.com/sudhirchaudhary

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading