मुलींनी समाजात आत्मविश्वासाने वावरावे कधीही सोडू नये – चित्रा वाघ
पुणे : मुलींनी समाजात आत्मविश्वासाने वावरावे आणि कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडू नये, असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रज्वलीत केलेली ज्ञानज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे. जो शिकेल तोच टिकेल, असा संदेश ही त्यांनी विद्यार्थिनींना दिला. पुणे हे जसे विद्येचे माहेरघर आहे तसेच पुणे हे समाजसेवेची पंढरी देखील आहे. मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य मला वर्षभराची ऊर्जा देऊन गेले आहे असेही त्या म्हणाल्या.
शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि भाजप चे प्रवक्ते, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेल्या ड्रेस वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोना काळात प्रत्येक घटकाला कर्तव्यभावनेतून मदत केली आणि त्यांनीच ही कल्पना मांडली की वस्ती विभागासह अनेक ठिकाणी मुलींना ह्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटकाळात अंगावर नवीन कपडे शिवता आले नाहीत, अश्या सर्वांना नवीन ड्रेस द्यावेत आणि त्यानुसारच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
यावेळी संयोजक शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, नगरसेविका वृषाली चौधरी, पेट्रोल डीलर असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, महिला मोर्चा उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, जयश्री तलेसरा, सुप्रिया माझीरे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण, शंतनू खिलारे, उद्योग आघाडीचे प्रदेश सह संयोजक विश्वजित देशपांडे, शहर सरचिटणीस रामदास गावडे, युवा मोर्चा सरचिटणीस दीपक पवार, आर्थिक आघाडीच्या शहर अध्यक्ष भाग्यश्री बोरकर, पक्ष पदाधिकारी श्रीकांत गावडे, संगीता शेवडे, मंगलताई शिंदे, विठ्ठल मानकर, माणिक दीक्षित, अमर खंडागळे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपक पोटे, पुनीत जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर शंतनू खिलारे यांनी आभार प्रदर्शन केले.
