Sunday, July 19, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएलच्या कात्रज आगारात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पीएमपीएमएलच्या कात्रज आगारात आज ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व कात्रज आगार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे व ऑरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बालाजी कल्याणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

याप्रसंगी पीएमपीएमएलचे कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, स्वच्छता विभाग प्रमुख नितीन वांबुरे, योगेश कल्याणे, कात्रज डेपो मॅनेजर विजय रांजणे, असिस्टंट डेपो मॅनेजर शैलेंद्र जगताप, कार्यालय अधिक्षक शिवाजी जाधव, डीएमई सचिन वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरच्या शिबिरात हिमोग्लोबीन, ब्लड ग्रुप, ब्लड शुगर, कॅल्शियम, ईसीजी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, नेत्र तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच मोफत औषधे देखील देण्यात आली.

यावेळी बोलताना पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून कात्रज आगारात आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर निश्चितच स्तुत्य असा उपक्रम आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना या शिबिराचा नक्कीच चांगला लाभ होईल.

डॉ. संदेश शेलार यांनी प्रास्ताविक केले. अनिल रेळेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading