पुणे शहरात आज दिवसभरात 1 हजार 805 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपर्यंत नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु मागील तीन चार दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 1 हजार 805 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 131 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 14 हजार 494 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 999 हजार 11 इतके रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात एकही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 5464 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 73 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 13443 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
