पुणे जिल्हा बँकेंवर पुन्हा एकदा अजित पवारांचे वर्चस्व; पण प्रतिष्ठेची जागा गमावली
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर उर्वरित 7 जागांसाठी मतदान करण्यात आले होते. त्यापैकी 6 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या तर एक जागा भाजपला जिंकण्यात यश आले आहे. भाजप उमेदवार प्रदीप कंद हे विजयी झाले असून त्यांना बारामतीतून 52 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
PDCC संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 20 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. मात्र प्रतिष्ठेची मानली जाणारी एक जागा मात्र भाजपच्या खिशात गेली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा केवळ 14 मतांनी पराभव झाला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांचे वर्चस्व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर असून आतापर्यंत त्यांनी सात वेळा पुणे जिल्हा बँकेचे संचालक पद भूषविले आहे.
