Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

MPSC परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर  

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

एमपीएससीमार्फत प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार

– राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021ची 2 जानेवारी 2022ची परीक्षा 23 जानेवारीला होणार आहे.

– महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 (पेपर क्र.  1)ची 22 जानेवारी रोजी होणारी परीक्षा 29 जानेवारीला होणार आहे.

– महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020 (पेपर क्र. 2) पोलिस उपनिरीक्षक पदाची 29 जानेवारी रोजी होणारी परीक्षा आता 30  जानेवारीला होणार आहे.

Leave a Reply