Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात मुलांच्या लासिकरणाला सुरूवात

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारी सुरुवात झाली. महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असून त्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुकर व्हावे, यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील ४० केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांचे स्वागत सभागृह नेते बिडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. करोनावर मात करण्यासाठी या वयोगटातील मुलांसह ज्या नागरिकांचा अद्यापही पहिला आणि दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन बिडकर यांनी यावेळी केले.

लासिकरणाबाबद मुलांमध्ये उत्सुकता 

“लस घेण्यासाठी आलेल्या या मुलांमध्ये लसीकरणाबाबतची उत्सुकता ही प्रचंड सकारात्मकता देणारी होती. या लसीकरणासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.”

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Leave a Reply