Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

न्यू इंग्लिश स्कूलचा १४२ वा वर्धापनदिन साजरा

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेचा १४२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पारितोषिक वितरण समारंभ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी गौरव कोंडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, त्यातून निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असे मत कोंडे यांनी व्यक्त केले. शिक्षक विनायक रामदासी यांना उपक्रमशील शिक्षक आणि ललिता गोळे यांना कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले.

शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, मुख्याध्यापिका दर्शना कोकरे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका अनिता भोसले यांनी स्वागत, योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन आणि उपशालाप्रमुख सुधीर विसापुरे यांनी आभार प्रदर्शन केले

Leave a Reply