Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट

पुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भिमा नजीक पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली.

यावेळी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि एकाच वेळी मोठी गर्दी होणार नाही अशा प्रकारे दर्शन रांगांचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading