मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणत, चंद्रकांत पाटलांनी शरद पवाराना लगावला टोला
पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसत्ता वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाची परिस्थिती तसेच त्यावेळी काय घडामोडी याबाबत माहिती दिली.त्याचं बरोबर त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी मला विचारले होते, हे देखील पवार यांनी सांगितले, यांच्या या वक्तव्यांवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे” असे म्हणत, चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांना चांगलेच टोले लगावले. तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. ते आज माध्यमांशी बोलत होते.
“मोदी यांनी आपण एकत्र सरकार स्थापन करु असं सांगितलं होतं असे भाष्य शरद पवार यांनी केले.त्यावर पाटील म्हणाले, “अजित पवार यांनी शपथ का घेतली ? शरद पवार यांनी त्यांना पाठवले होतो का ? हे मला समजणार नाही. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण मी शरद पवार यांना एकच प्रश्न विचारेन हे सगळं सांगायला तुम्ही इतके महिने का लागले.
तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार. मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का ? हा मोठा प्रश्न आहे,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.
