Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाचं संकट बिकट आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : हॉटेलचं उद्घाटन थांबवलं आहे असं बरेच जण सांगतात. मलाही तिथं जायला आवडेल पण मी तिथं गेल्यावर गर्दी होणार. अलिकडे सोशल मीडिया किती अॅक्टिव्ह आहे माहितीय. गर्दी झाली की त्याचे फोटो व्हायरल होतात, मग केसेस दाखल कराव्या लागतात. आम्ही केस दाखल करतो मग आता आमच्यावर कोण केस दाखल करणार? मग प्रश्नही निर्माण होतो की यांच्यावर केस होणार का? म्हणून आम्ही मुरड घालतो. पण तरीही उद्घाटनासाठी पत्रं येतात. पण खरंतर उद्घाटनासाठी नका थांबू, काम सुरु करा. आपण सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी . असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
निवडणूक प्रचारार्थ झालेल्या मेळाव्यात बोलताना केले आहे.

या प्रचार मेळाव्याला या  मेळाव्याला आमदार संजय जगताप, आमदार दत्ता भरणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरअध्यक्ष प्रशात जगताप, माजी  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे शहर प्रवक्ते अंकुश काकडे,प्रदीप देशमुख,खासदार वंदना चव्हाण,विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व सहकार पॅनल चे उमेदवार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरातिल पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर जिल्हा बँकेत निवडून येणं गरजेच आहे. मात्र आता बँकेत ठेवी वाढल्या म्हणजे बँक मोठी होत नाही. ज्या बँकेच्या ठेवी 10 हजार कोटींच्या वर असेल तिथे ठेवी ठेवल्या तरी चालतील असे पवार यावेळी म्हणाले. राज्यातील अनेक जिल्हा बँका रसातळाला गेल्यात राज्यात आहेत, बॅकांची बिकट परिस्थिती असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

जिल्हा बँक निवडणुकीत काहीजण माझ्याबाबत अफवा पसरवत आहेत. दादा असे म्हटले दादा तसे म्हटले. पण अस काही नसल्याचे अजित पवार म्हणाले. तसंच उद्घाटनाचे कार्यक्रम इत्यादीला होणारी गर्दी टाळा असंही त्यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांकडून इतर राज्यात चालतं पण इथं का नाही असं विचारलं जातं. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काही राज्यात निवडणुका होतात तिथं कसं चालतं, तुमच्या मनात अशी शंका येणं साहजिक आहे. पण आपण गांभीर्याने घ्यायला हवं. अनेकजण भेटतात आणि सांगतात की तुमच्यासाठी उद्घाटन थांबवलं आहे असं सांगतात. कार्यालयाचे उद्घाटन सांगितल्याचं बरेच जण सांगतात.

पुणे जिल्हा बँकेच्या प्रचार मेळाव्यात अजित पवार बोलत म्हणाले की, हॉटेलचं उद्घाटन थांबवलं आहे असं बरेच जण सांगतात. मलाही तिथं जायला आवडेल पण मी तिथं गेल्यावर गर्दी होणार. अलिकडे सोशल मीडिया किती अॅक्टिव्ह आहे माहितीय. गर्दी झाली की त्याचे फोटो व्हायरल होतात, मग केसेस दाखल कराव्या लागतात. आम्ही केस दाखल करतो मग आता आमच्यावर कोण केस दाखल करणार? मग प्रश्नही निर्माण होतो की यांच्यावर केस होणार का? म्हणून आम्ही मुरड घालतो. पण तरीही उद्घाटनासाठी पत्रं येतात. पण खरंतर उद्घाटनासाठी नका थांबू, काम सुरु करा. आपण सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी असंही अजित पवार म्हणाले. राज्यातील अनेक जिल्हा बँका रसातळाला गेल्या आहेत. राज्यात बँकांची बिकट परिस्थिती असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading