Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

आळंदी येथे रक्तदान शिबिराला मोठा प्रमाणात प्रतिसाद

आळंदी :आळंदी फ्रुटवाले धर्मशाळा येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे एक आठवडयात दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले होते. भाजपा कायदा आघाडी पुणे जिल्हा, वंजारी सेवा संघ, नवोदित वकील वर्ग, राष्ट्रीय दृष्टीहिन संघ, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व आदी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नाने रक्तदान शिबिर घेण्यात आले,

या कार्यक्रमाचे उद्घाटन, दिपप्रज्वलन व प्रतिमेचे पुजा पुणे जिल्हा अध्यक्ष कायदा आघाडी - ॲड. संजय सावंत पाटील, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सिद्धू बिराजदार, योगिता नागरगोजे (नगरसेविका पिंपरी चिंचवड), अजित वडगावकर राहुल जाधवर (अध्यक्ष वंजारी सेवा संघ),रवी खेडकर, स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष - संदीप सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास पाहुणे संजय घुंडरे, अवि बोरुदिया, ॲड सूर्यकांत चौधरी, ॲड.एम. एस. नाडे, विकास आघावर, काळभोर ताई, विनोद मुंडे, जयश्री मुंढे, नाना खेडकर, ज्ञानेश्वर केंद्रे, के. डी.पालवे, सर्जेराव भांगे, श्याम बाला भांगे, शेख सुलतान, विजय बडे, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक मधील मान्यवर काशिनाथ गीते, गजानन नागरे, ज्ञानेश्वर माऊली शेठ थोरवे, बाळासाहेब पालवे, पांडुरंग महाराज विघ्ने, देवरे सर, राजू मामा दराडे, मंगेश मुंढे, भागवत घुगे यांनी अथक परिश्रम केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पुणे सहसचिव भाजपा वकील आघाडी ॲड. एस. एस. आघाव यांनी केले....

उपस्थित मान्यवरांना ॲड. संजय सावंत पाटील यांनी संबोधण्यात आले रक्तदान शिबिर घेणे म्हणजेच स्व. गोपीनाथराव मुंढे साहेबांची खरी आदरांजली होईल, आयुष्यभर मुंडे साहेब संघर्ष करुन न्याय देण्याचे काम केले होते तसेच आपण रक्तदानासारखे उपक्रम राबवुन सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होईल आणि या माध्यमातुन आपण जनतेला रक्ताचा पुरवठा करणे ही भाग्याची व अभिमानाची बाब आहे आणि अशा पध्दतीने जयंती साजरी केली तरच योग्य राहिल असे उपक्रम होत असताना ज्यांना दृष्टी नाही असे अनेकजण आज सक्रिय सहभाग घेऊन स्वतः याठिकाणी रक्तदान करत आहेत हे पाहुन मोठा अभिमान वाटतो असे आपल्या भाषणात पुणे जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी – ॲड. संजय सावंत पाटील यांनी व्यक्त केले…

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading