मेट्रो सारख्या शासकीय संस्थेने नदीपात्रात राडारोडा टाकण्यात चुकीच असून यावर तातडीने कारवाई करावी – खासदार वंदना चव्हाण
पुणे:पुण्यात सध्या सर्वत्र मेट्रो चा काम जलद गतीने सुरू असून या मेट्रोच्या कामामुळे जे उत्खनन होत आहे त्याचा राडारोडा नदीपात्रात टाकला जात आहे.
पुण्यातील डीपी रोडवर हा राडारोडा पडत असून राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवाडकर नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या परिसराची पाहणी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, मेट्रो सारख्या शासकीय संस्थेने नदीपात्रात राडारोडा टाकण्यात चुकीच असून यावर तातडीने कारवाई करावी . अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी केली.
यावेळी बोलताना यादवाडकर म्हणाले, मेट्रो प्रशासन कोणालाच जुमानत नसुन पुणेकरांना वेठीस धरत आहे. याविषयी सजग पुणेकरांनी आवाज उठवला पाहिजे.
