Friday, September 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विदर्भात उद्या पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

पुणे : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार  विदर्भात उद्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरगांबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

राज्यात काल औरगांबाद, अहमदनगर, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर नांदेडमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात गारपीटही झाली होती. अवकाळी पावसामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यानंतर आज हवामान विभागाने  पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात उद्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading