Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पुणे शहरातील प्रसारभारतीमधील FTII इमारतीच्या कामात अडथळा ठरत असलेली कोथरूड परीसरात पाणीपुरवठा करणारी 800 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने स्थलांतरीत करुन सध्याच्या जलवाहिनीला जोण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.30) कोथरुड भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (दि.31) कोथरुड परिसरात पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद – डहाणुकर कॉलनी रामबाग कॉलनी, सुतारदरा, किष्कींदानगर, जय भवानी नगर, कोथरूड गावठाण इ. परिसर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading