Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला; ‘या’ दिवशी होणार अधिवेशन

मुंबई : कोविडमुळे गेले दोन वर्षे लागोपाठ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबई येथेच हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूर येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे हे अधिवेशन होणार आहे. याबाबत राज्य सरकार कडून आज अधिकृत घोषणा करण्यात आली.

आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा आग्रह विरोधकांनीही धरला होता. त्यावर मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांना हवाई प्रवास सुद्धा करण्यास मनाई करण्यात आल्याचे  सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता. तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसेल तर पुढील अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनीही या मागणीला संमती दिली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading