fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

पेटीएमकडून किपायतशीर मोबाइल रिचार्जेसची सुविधा

मुंबई : भारताच्या आघाडीच्या ग्राहक व व्यापाऱ्यांसाठीची डिजिटल परिसंस्‍था ब्रॅण्‍ड पेटीएमची मालक वन९७ कम्‍युनिकेशन्‍स लिमिटेडने आज नुकतेच दरामध्‍ये करण्‍यात आलेल्‍या वाढीनंतर प्रीपेड मोबाइल रिचार्जसाठी कॅशबॅक व इतर रिवॉर्डसची घोषणा केली आहे. रिचार्जेसवर पहिल्‍यांदाच युजर्सना आता प्रोमो कोड ‘FLAT15’च्या वापरावर १५ रूपयांची सूट मिळेल. तसेच विद्यमान युजर्स विविध ऑफर्समधून निवड करू शकतात, ज्‍यामध्‍ये त्‍यांना प्रोमो कोड ‘WIN1000’ वापरावर जवळपास १००० रूपयांची कॅशबॅक जिंकण्‍याची संधी आहे.

या ऑफर्स जिओ, व्‍हीआय, एअरटेल, बीएसएनएल व एमटीएनएलच्‍या सर्व प्रीपेड कनेक्‍शन्‍सवर लागू आहे. कंपनीने पुष्‍टी देखील दिली आहे की, अशा व्‍यवहारांवर कोणत्‍याही प्रकारचे अतिरिक्‍त शुल्‍क किंवा प्रक्रिया शुल्‍क आकारण्‍यात येणार नाही. ज्‍यामुळे युजर्सना रिचार्ज रक्‍कमेव्‍यतिरिक्‍त कोणतीही रक्‍कम भरावी लागणार नाही.

रिचार्ज व बिल पेमेण्‍ट्ससाठी रिवॉर्डसचा लाभ घेण्‍यासोबत युजर्स कंपनीच्‍या रेफरल प्रोग्रॅममध्‍ये सहभाग घेत अतिरिक्‍त कॅशबॅक जिंकू शकतात. युजरने मोबाइल रिचार्जसाठी पेटीएमचा वापर करताना मित्र व कुटुंबियांचा संदर्भ दिला तर रेफरर व रेफरी जवळपास १०० रूपयांची कॅशबॅक जिंकू शकतात.

युजर्सची सोय आणखी वाढवण्यासाठी पेटीएमने नुकतेच त्‍यांच्‍या मोबाइल रिचार्ज अनुभवात आणखी सुधारणा केली आहे. यामध्ये ३-क्लिक इन्स्टण्ट पेमेंट आणि युजर-फ्रेंडली डिस्‍प्‍ले ऑफ प्लान्स यांसारख्या सुविधांची भर करण्‍यात आली आहे. तसेच अॅप युजर्सना त्यांची बिलाची वर्तमान रक्‍कम व मुदतीची तारीख यांचीही अखंडितपणे आठवण करून देत राहते.

पेटीएम प्रवक्‍ता म्‍हणाले, ”नुकतेच जिओ, एअरटेल व व्‍हीआयच्‍या मोबाइल रिचार्जच्‍या दरामध्‍ये वाढ झाली आहे. आमच्‍या कॅशबॅक ऑफर्स युजर्ससाठी निश्चितच आनंददायी ठरतील. आम्‍ही पेटीएम अॅपवर मोबाइल रिचार्ज अगदी मोफत, सोईस्‍कर व विनासायास ठेवले आहे. पेटीएम व्‍यासपीठावर युजर्सना मोबाइल रिचार्जसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्‍क किंवा अतिरिक्‍त शुल्‍क भरावे लागणार नाही.”

पेटीएम युजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, डेबिट व क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग या त्‍यांच्‍या पसंतीच्‍या पेमेण्‍ट मोडमधून निवड करण्‍याची मुभा देते. युजर्स कंपनीचे ‘बाय नाऊ पे लेटर’ या  पेटीएम पोस्‍टपेड वैशिष्‍ट्याचा उपयोग करून देखील पेमेण्‍ट करू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading