ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणूका होऊ देणार नाही – हुलगेश चलवादी
पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने ओबीसी राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश मरियप्पा चलवादी यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना या विषयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ,ओबीसी सन्मान मे बसपा मैदानमे अश्या घोषणा देण्यात देण्यात आल्या .यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड ,पुणे जिल्हा प्रभारी रमेशआप्पा गायकवाड ,मिलिंद भोसले, गणेश खंदारे ,सागर खंडे, पुणे जिल्हा महासचिव रमेश घोडके, पुणे शहर सचिव सुनील गवळी, श्रीकांत कसबे ,बाळासाहेब तपासे, अनिल गायकवाड ,बाळासाहेब हतांगडे, सुदीप कांबळे ,शरणाप्पा कोचे, रवी गायकवाड ,साहेबराव शिंदे, सुनील रोकडे ,नंदाताई शिंदे, मधुकर शिंदे ,दिनकर माळी ,मयूर माळी ,शाम माळी ,विनोद गायकवाड , सुमेध सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
