BIG NEWS – देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारी पासून
नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर देशातील 15 ते 18 वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणास 3 जानेवारी 2022 पासून सुरुवात करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस सुरू10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मोदी म्हणाले, जगभरात ओमायक्रॉनचे संकट आले आहे. ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे. भारतानं आतापर्यंत 141 कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.
प्रॉकॉशनरी डोस
60 वर्षांवरील ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी डोस दिला जाईल. येत्या 10 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु केलं जाईल, असं मोदींनी यावेळी म्हटलं. त्याचप्रमाणं फ्रंट लाईन आरोग्य कर्माचाऱ्यांना प्रॉकॉशनरी कोरोना लसीचा डोस दिला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. गंभीर आजारांपासून पीडित असलेल्या आणि कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी लस दिली जाणार आहे.
