Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची बैठक संपन्न

पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील निरनिराळ्या पीकांचे सन २०२२-२३ साठीचे पीककर्ज दर निश्चित करण्यात आले.

नाबार्डच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत  नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक रोहन मोरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सहकार विभागाचे सहायक निबंधक बाळासाहेब तावरे, कृषी विभागाचे उपसंचालक विजय कानडे, अग्रणी बँकेच्या बँक प्रतिनिधी किरण अहिरराव, कृषी विस्तार संचालक शांताराम साकोरे उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकरी व इतर जिल्हा तांत्रीक समिती सदस्य यांचेशी पीककर्ज दर चर्चा करण्यात आली. पीकाचे उत्पन्न, त्यासाठी  येणारा खर्च व राहणारा नफा यांची सांगड घालून पीककर्ज दर ठरविण्यात आल्याचे डॉ.देशमुख यांनी यावेळी सांगितले. दर १५ दिवसांनी कर्ज वाटपाचा आढावा घेणार असल्याचेही ते म्हणाले.

मागील तीन वर्षातील सर्वात अधिक कर्ज वाटप केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  अभिनंदन केले. २०२१-२२ हंगामामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण ३ हजार ४३ कोटी ररुपये कर्ज वितरणापैकी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजार ३० कोटी रुपये कर्ज वितरण केले आहे.

पीककर्ज हंगाम सन २०२२-२३ साठीचे पीककर्ज दर ठरविण्यासाठी समिती सदस्यांनी विविध पिकांवरती व पीकांच्या उत्पादन खर्च बाजारभाव आणि त्या अनुषंगाने बँकेद्वारा पीककर्ज पुरवठ्याबाबत आपले मत व्यक्त केले.

बैठकीस पशुसंवर्धन व दुग्ध विकास, मत्स्य विभाग, पुणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, कृषी अर्थशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणेचे  प्रतिनिधी, जिल्ह्यात कर्ज पुरवठा करणाऱ्या प्रमुख व्यापारी व खासगी बँकांचे प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील प्रत्येकी १ प्रगतीशील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading