ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता पुणे महापालिकेकडून नाताळ साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
पुणे: राज्यात ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच चर्च आणि अन्य ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहनही महापालिकेनं केलंय.
नाताळच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिके कडून बनवलेले नियम ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता नाताळ सण साधापणाने साजरा करा,चर्च आणि इतर ठिकाणी गर्दी करु नका,चर्चमध्ये प्रार्थनेसाठी केवळ 50 टक्के उपस्थिती बंधनकारक,सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्कचा वापर करावा, चर्चबाहेर स्टॉल किंवा दुकान लावण्यास बंदी,
मिरवणुका आणि फटाक्यांच्या आतषबाजीवरही बंदी,चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आयसह अन्य सजावट केल्यास गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करा,मिरवणुका आणि फटाक्यांच्या आतषबाजीवरही बंदी, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे, मास्कचा वापर करावा या नियमाचे पालन नागरिकांने करावे असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे केले आहे.
