ठाकरेंचा चार्ज इतर ठाकरेंनी घ्यावा – चंद्रकांत पाटील
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज हिवाळी अधिवेशनाला गैहजर होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘ठाकरेंचा चार्ज इतर ठाकरेंनी घ्यावा’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या कुटूंबावर निशाणा साधला. तसेच काहीही होवू शकत, ठाकरे सरकारने लोकशाही पायदळी तुडवली आहे, अशी टीका ही केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रीया झाल्यामुळे गेल्या 50 दिवसांपासून ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नाहीत. मंत्रीमंडळ बैठकीसही ते गैहजर होते तसेच आज हिवाळी आधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या उपस्थितीवरून विरोधकांकडून सतत आरोप केले जात आहेत. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुख्यमंत्री बदलावरून वक्तव्य केले होते. “मुख्यमंत्र्याची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी दुसऱ्या कोणाकडे तरी चार्ज द्यावा. त्यांचा इतर कोणावर विश्वास नसेल तर पुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्यावा” अशी टीका पाटील यांनी केली.
फुकट सल्ले देवू नका
पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ हे उत्तम काम करीत आहेत. हे विरोधकांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी असे फुकट सल्ले देवू नये.
