‘बाहुबली’ला उत्सुकता प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची
भव्य दिव्य ऐतिहासिक सेट, चपखल संवाद आणि लक्षवेधी ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या अभिनेता प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरची सगळीकडेच चर्चा आहे. ‘बाहुबली’ फेम साऊथ स्टार प्रभास याला देखील या चित्रपटाची उत्सुकता असून आज त्याने आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेयर केला आहे. इतकेच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हीने देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेयर करीत दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे चित्रपटाची उत्कंठा अधिकच वाढली आहे.
‘बाहुबली’ अर्थात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याने या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाची दखल घेतली आहे. त्याने आपल्या फेसबूक अकाऊंटवर ‘सरसेनापती हंबीरराव’ या बीग बजेट मराठी चित्रपटाचा टीझर शेयर करीत दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=481903036626228&id=100044196081040
अभिनेत्री रवीना टंडन हीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाचा टीजर शेयर करीत दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Pravin Tarde आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा🙏 Best wishes @WriterPravin and team .. looking forward 😊🙏🏻 pic.twitter.com/sPhpFiXxff
— Raveena Tandon (@TandonRaveena) December 22, 2021
छत्रपती शिवाजी महारज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य गाथा ‘सरसेनापती हंबीरराव’ या बीगबजेट मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मिडियावर लॉंच करण्यात आला. या टीझरला 2 मिलियन पेक्षा जास्त हीट मिळाले आहेत.या टीझर मधील चित्रपटाची भव्यता, संवाद आणि ऍक्शन सिक्वेन्स प्रेक्षकांचे लक्षवेधून घेत आहेत. बॉक्स ऑफिस हीट ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटानंतर लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे हे भव्य दिव्य असा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट घेवून आले आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. तसेच सरसेनापती हंबीरराव यांची मुख्य भूमिकाही अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे साकारणार आहेत.
