Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँक – डॉ पी ए इनामदार यांच्या पॅनलचा सर्व १७ जागांवर दणदणीत विजय

पुणे : मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ.पी.ए.इनामदार यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी महाज’पॅनलचा सर्व १७ जागांवर विजय झाला आहे.विरोधात उतरलेल्या पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.

या निवडणूकीसाठी रविवार दिनांक १९ डिसेंबर रोजी मतदान झाले.मंगळवारी मतमोजणी झाली आणि सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.स्नेहा जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.डॉ.पी.ए.इनामदार,लुकमान हाफिजउद्दीन खान,अयुब इलाहींबक्ष शेख,मोहमद गौस शेर अहमद सय्यद,सईद बाबासाहब सय्यद,सय्यद अली रजा इनामदार,तन्वीर पीरपाशा इनामदार,खुदादोस्त मुस्तेजाब खान,अफझल कादर खान,महंमद जाकीर अयुब खलिफा,इकबाल इस्माईल शेख ,मुनव्वर रहेमतुल्लाह शेख हे उमेदवार सर्वसाधारण गटातून विजयी झाले.

महिला राखीव गटातून अंजुम सलीम मणियार,आयेशा फिरोज तांबोळी विजयी झाल्या. इतर मागासवर्ग राखीव गटातून अल्ताफ हैदरभाई सय्यद,विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग राखीव गटातून समीर मोहिद्दीन शेख विजयी झाले.अनुसूचित जाती -जमाती राखीव गटातून दानिश रौनक खान तडवी विजयी झाले.

‘सर्वसामान्यांसाठी कार्यरत असल्याने आणि बँकेच्या हिताचे निर्णय घेतल्यानेच आमच्या ‘अवामी महाज पॅनल’चा दणदणीत विजय झाला आहे,बँकेविरुद्ध अपप्रचार करणाऱ्यांना हा एकप्रकारचा धडाच आहे.यापुढेही बँकेच्या आणि समाजाच्या हितासाठी जोमाने कार्यरत राहू’,अशी प्रतिक्रिया डॉ.पी.ए.इनामदार यांनी या विजयांनंतर व्यक्त केली .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading