शिक्षक पात्रता पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांकडून सुखदेव डेरे यांना अटक – अमिताभ गुप्ता
पुणे:शिक्षक पात्रता पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांकडून अटक सत्र सुरूच असून काल सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सुखदेव ढेरे याच्यासह जी.ए.सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी रात्री पुणे पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे देखील गुप्ता यावेळी म्हणाले त्याचबरोबर पेपर प्रकरणात अटकेत असलेल्या तुकाराम सुपेच्या चौकशीतून अनेक खुलासे समोर आला असल्याचे देखील गुप्ता पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
500 नापास विद्यार्थ्यांना पास म्हणून दाखवले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे देखील गुप्ता पत्रकार परिषदेत म्हणाले.
