Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

प्राणी संग्रहालयातील कर्मचार्यांना सहा महिने मुदतवाढ

पुणे: महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांना स्थायी समितीने सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही पदे कायमस्वरुपी भरायची आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पद भरतीची कार्यवाही होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading