मेट्रोच्या लकडी पूलावारील कामाला महाविकास आघाडीचा विरोध
पुणे:पुण्यात दरवर्षी गणपती उत्सव हा पुण्यात जोरात केला जातो पुण्यात 24 तास गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूक चालतात.पण गणपती विसर्जन मिरवणुकिना पुण्यात येणाऱ्या नव्या मेट्रोमुळे मिरवणूक काढता येणार नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. मुख्य सभेत याचे पडसाद उमटले. सत्ताधारी भाजप ने मेट्रो पुण्यातील मध्यवर्ती अलका चौकात करण्याचा घाट घातला आहे. सत्ताधारी भाजपने पुण्याची दरवर्षी होणारी गणपती विसर्जन मिरवणूक मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयाच्या विरुद्ध आज पुणे महानगरपालिकेत जुन्या इमारतींच्या पायऱ्या समोर पुण्यातील महाविकास आघाडी मधल्या घटक पक्षांनी याचा निषेध व्यक्त केला. याचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसे हे पक्ष उपस्थित होते.
याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल ,मनसे चे युवा नेते सारंग सराफ, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना, व मनसे मधील पुणे महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, या सत्ताधारी भाजपने लकडी पूलावरून मेट्रो घालण्याचा घाट घातला आहे. यामुळे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीना अडथळा निर्माण होणार आहे. याचा विरोध
विरोध सामान्य नागरिक , प्रत्येक गणपती मंडळाकडून व प्रत्येक पक्षा कडून विरोध होत आहे.
आमची या आंदोलनातून एक मागणी आहे. नवीन होणारा पूल हा बांधू नये.
आबा बागूल म्हणाले, दरवर्षी गणपती मंडळ ही विसर्जन मिरवणूक ही अलका चौका तून विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी उत्साही असतात. पण या पुणे महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजप प्रशासनाने लकडी पूल बांधण्याचा घाट घातला आहे. ह्या निर्णयाच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन करत आहोत.
