संतूर आणि बासरीच्या नादमधुर सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
पुणे : बासरीचे नादमय स्वर, संतूरचे मनमोहक सूर आणि त्याला अप्रतिम अशी नादमय तबल्याची साथ असा त्रिवेणी संगम साधत कलाकारांनी संतूर आणि बासरीचे नादमधुर सादरीकरण केले.
नारायण पेठेतील श्रीमद् जगद्गुरु श्री शंकराचार्य मठातर्फे वादनसेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मठाचे यश रामलिंगे, अमरनाथ चक्रदेव, अभिषेक दुबे, किशोर जोशी उपस्थित होते. संतूर वादक शंतनू गोखले, बासरी वादक एस.आकाश यांनी आपल्या अप्रतिम वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अजिंक्य जोशी यांनी कलाकारांना तबल्याची साथ दिली.

शंतनू गोखले यांनी राग पूरिया कल्याणमध्ये विलंबित रूपक तीन ताल सादर करून आपल्या वादनाची सुरुवात केली. संतूरचे सूर आणि तबल्यातून निर्माण होणारे ताल यांचा सुरेल संगम सादत कलाकारांनी आपल्या अलौकिक संगीताची रसिकांना भेट दिली. रसिकांनीही उत्स्फूर्त दाद देत संगीताच्या या मैफिलीचाचा आनंद घेतला.
उत्तरार्धात एस. आकाश यांचे बासरीवादन झाले. त्यांनी राग गोरख कल्याण जप् तालातील बंदिश सादर करून आपल्या मैफिलीची सुरुवात केली. आकाश यांचे अप्रतिम बासरी वादन आणि त्याला तितकीच सुंदर अशी तबल्याची मिळालेली साथ यामुळे तबला आणि बासरी यामधील जुगलबंदी चा आनंद घेताना रसिक मंत्रमुग्ध झाले होते.