Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ व पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी  महापुरुषांचा अपमान केल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक येथे झालेल्या विटंबनेचे पडसाड काल पासून महाराष्ट्रात उमटत आहेत. या घटनेचा निषेध काल विविध पक्षानी केला.आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेध करण्यात आला.
.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज  पुणे दौऱ्यावर आहेत. ते येण्यापूर्वी त्यांचा दौरा  वादात सापडला आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी भाजप पदाधिकारी व नेत्यांनी अमित शहा यांचे पुणे शहरात होल्डिंग लावले आहेत. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराजांचे फोटो लावले नाहीत. या घटनेचा निषेध करण्यासाठी पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.


हे निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या निषेध आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, रुपाली पाटील ठोंबरे, स्वाती गायकवाड, पुणे शहर महिला अध्यक्षा मृणाल वाणी, विविध पदाधिकारी , महिला कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत पण त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुणे शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठ मोठे पोस्ट लावले आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा व  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नाही आहे. व काल बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेन झाली त्या निषेधार्थ आम्ही आज आंदोलन करत आहोत. असे प्रशांत जगताप म्हणाले,.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात येण्याच्या आधी बंगळूरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना त्यांनी केली त्या नराधमांना अटक करायला पाहिजे होती.
आम्ही अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत. असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading