fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

देशाचे गृहमंत्री यांची दगडूशेठ गणपतीला प्रार्थना : अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होण्यासाठी देखील मागणे

पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो… असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.  ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading