ईव्हीएम इंडियाची २०० कोटी रूपयांच्या लीगमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने वाटचाल
पुणे : भारतीय आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रातील सर्वाधिक विश्वासू कंपन्यांपैकी एक हुंडिया इन्फोसोल्यूशन्स कंपनीने विशेष आणि सखोल कार्यान्वयन मॉडेलचा वापर करून वार्षिक नफा कमावताना मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त केला आहे. हुंडिया इन्फोसोल्यूशन्स कंपनी हि इंडियन कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी असून येणाऱ्या आर्थिक वर्षात कंपनी एसएसडी, गेमिंग मोड्यूल्स, सर्व्हर मोड्यूल्स, ब्लूटूथ स्पीकर्स, टीडब्ल्यूएस ऑडिओ उत्पादने, गॅन चार्जर्स, केबल्स आणि चार्जर्स अशी अनेक उत्पादने बनवणार आहे.
या कंपनीला आर्थिक वर्ष २०२२ मध्ये वार्षिक २०० कोटी रूपयांची उलाढाल मिळेल अशी अपेक्षा आहे . आर्थिक वर्ष २०२१ च्या ९८ कोटी रूपयांच्या तुलनेत ती वार्षिक पातळीवर १०४ टक्के वाढ असेल. तसेच कंपनीने २०२२ च्या पहिल्या सहामाहीत १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त महसूल कमावला आहे.
ईव्हीएम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल हुंडिया म्हणाले की आम्ही मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी या २०० कोटींच्या सेटअपसाठी उत्सुक आहोत आणि नवीन उत्पादन वर्गवारी तसेच उत्पादने आणि नावीन्यपूर्णता आणण्याच्या प्रयत्नात आहोत. ईव्हीएममध्ये आम्ही सातत्याने नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह आपल्या उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यरत असून तंत्रज्ञानाची दरी भरून काढत आहोत. आम्हाला खात्री आहे की, आमची उत्पादने लोकांपर्यंत चांगल्या सेवा देतील .
मागील १३ वर्षांपासून ईव्हीएम इंडिया ही कंपनी आपल्या दर्जा आणि वर्गातील सर्वोत्तम आफ्टरसेल्स सेवांसाठी ओळखली जाते. ईव्हीएमकडे देशभरात ५०० पेक्षा अधिक सेवा केंद्रे असून ती कंपनी आपल्या ‘बाय वन गिव्ह टेन’ उपक्रमाअंतर्गत विकल्या गेलेल्या प्रत्येक उत्पादनामागे १० रूपये बालकांच्या कर्करोग निधीला देते.
पुनर्संशोधन आणि डिजिटल बदलाला चालना देण्यासाठी ईव्हीएम ही कंपनी या जागतिक साथीदरम्यान पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली झाली आहे. ही कंपनी बी२बी स्थितीपासून पॅन इंडिया कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी झाली आहे आणि तिच्याकडे २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे उत्तम मनुष्यबळ आहे. तिने सक्षम कॉर्पोरेट संस्था म्हणून वाढीच्या दिशेने काम सुरू केले असून तिच्या सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध आहेत. तसेच, ईव्हीएमकडे १५० पेक्षा अधिक एसकेयूच्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी आहे.
