Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

…ही तर लहान-सहान घटना ; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

बंगळुरुत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना 

मुंबई : कर्नाटकातील बांगळूरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र आणि बेळगाव येथे तीव्र पडसाद उमटत आहेत. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अतिशय बेजबाबदार पानाचे वक्तव्य केले आहे. बंगळुरातील ही घटना लहान-सहान असून त्यावरुन सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अयोग्य आहे, असे संतापजनक वक्तव्य बसवराज बोम्माई केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी हे वक्तव्य केले असून यामुळे असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. बोम्माई म्हणाले की, “शुक्रवारी रात्री  बंगळुरु येथे घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. अशा लहान सहान गोष्टीवरून दगडफेक करणे, सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नव्हे. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत गृहमंत्र्यांना सांगितले आहे. पुतळ्याची विटंबना करणे हे देशभक्तांचे काम नव्हे.”

मुंबईत भाजप कार्यालयावर शिवसैनिकांचे आंदोलन 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानावर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. या विधानाच्या निषेधार्थ मुंबई येथील भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading