Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल परब शिवसेनेचा गद्दार! – रामदास कदम

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची खदखद व्यक्त  

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून  शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात सुरू असलेला वाद आज लेटर बॉम्बच्या रूपाने बाहेर आला. यामध्ये रामदास कदम यांनी परब यांच्यावर निशाणा साधत ‘अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार असून राष्ट्रवादीच्या सोबतीने  काहीजण राजकारणातून मला व शिवसेनेला संपविण्याचा घाट, घालत आहेत’,अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच कदम यांनी उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या या पत्रकार परिषदेमुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

रामदास कदम यांनी पत्रात मांडलेले ठळक मुद्दे – 

  • आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्रिपद दिले. ते कुणाची घरे फोडणे, शिवसेना नेत्याला इतर पक्षांच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून संपवणे अशी कामे करत आहेत.
  • सूर्यकांत दळवी माझ्यावर वारेमाप टीका करतो. ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत व जिल्हा परिषद निवडणुका, विधासनभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये त्याने उघडपणे शिवसेनेच्या विरोधात काम केले आहे.
  • कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत मागील चार वर्षांपासून काम करीत आहे. नुकत्याच नारायण राणे यांच्या जनयात्रेमध्ये ज्यांनी आवर्जुन हजेरी लावली. त्यात सूर्यकांत दळवीची (सूर्याजी पिसाळ) पक्षातून हकालपट्टी का होत नाही?
  • मनसेचा नगराध्यक्ष वैभव खेडेकर याच्या भ्रष्टाचाराला आपलेच मंत्री खतपाणी घालतात. त्याला मदत करतात. मग आपल्या (शिवसेनेच्या) मंत्र्यांचा हेतू काय, फक्त रामदास कदम याला संपविणे असाच आहे का, असा प्रश्नी त्यांनी पत्रातून विचारला आहे.
  • अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टच्या उद्घाटनच्या पूजेला राष्ट्रवादीचा माजी आमदार व मनसे नगराध्यक्ष कसा जातो? त्याचे फोटोसह आपल्याला पुरावे देईन. मी, आम्ही नेमके काय करायचे? मात्र, मी शिवसेनेचा नेता आहे, त्याचे भान आहे. त्यामुळे आजपर्यंत किरीट सोमय्या यांच्याकडे कधीही संपर्क साधला नाही, बोललो नाही व त्यांच्याशी काहीही संबध नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading