fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

 बहूप्रतिक्षित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

 भव्य ऐतिहासिक चित्रपट पुढील वर्षी 2022 मध्ये होणार प्रदर्शित

मराठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पहात असलेल्या आणि प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्याची क्षमता असलेल्या लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’या बहूप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.  या रक्त उसळवणाऱ्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

प्रविण विठ्ठल तरडे हे ‘मुळशी पॅटर्न’या बॉक्स ऑफिस हीट ठरलेल्या चित्रपटानंतर ‘सरसेनापती हंबीरराव’हा ऐतिहासिक चित्रपट घेवून आले आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून यामाध्ये सरसेनापती हंबीरराव यांची मुख्य भूमिकाही ते साकारणार आहेत. तसेच मराठीतील हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading