Monday, November 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

इंडियन आयडल मराठीच्या मंचावर गुरु शिष्यांचे  दमदार सादरीकरण

सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठी हा  कार्यक्रम  अल्पावधीतच  प्रेक्षकांच्या पसंतीस ठरत आहे . महाराष्ट्रातील दमदार टॉप १४ स्पर्धक  रसिकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे . तसेच  आपल्या सुरेल आवाजाने सर्व स्पर्धकांनी   परीक्षक अजय अतुल यांना मंत्रमुग्ध केले आहे . दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या , तसेच ९० च्या दशकात एक से एक गाणी गाऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या  राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यंदाच्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत.

पुण्यातील आळंदी येथील स्पर्धक अमोल सकट याचे गुरु चंदन कांबळे हे देखील या आठवड्यातील विशेष भागात  विशेष उपस्थिती लावणार आहेत  .अमोल च्या लखबाई या लोकगीताने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते .हे लोकगीत अमोल चे गुरु चंदन कांबळे यांनी लिहिले असून त्याला  संगीतबद्ध  केले आहे.  यामुळे खुद्द परीक्षकांना  देखील अमोल च्या गुरूंना भेटायचे होते . अजय – अतुल यांच्या इच्छेखातर आणि अमोल ला सरप्राईज म्हणून चंदन कांबळे यांना बोलावण्यात आले आहे . चंदन गुरुजींनी लखाबाई हे गाणं सादर केलं तेव्हा अजय-अतुल सह साधना ताईंनी सुद्धा त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिलं. आतापर्यंत केलेल्या कामाचं चीज या मंचावर येऊन झालं आणि त्यांचं बऱ्याच वर्षांपासूनच स्वप्न पूर्ण झालं असं या वेळी चंदन गुरुजी म्हणाले. आपल्या गुरूंच्या येण्याने अमोलदेखील भावुक झाला होता.

Leave a Reply