गोपाळदादा तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्तेपदी फेरनियुक्ती
पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे शहरातील ज्येष्ठ नेते मा. गोपाळदादा तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी नुकतीच फेर नियुक्ती केली आहे. मा गोपाळदादा तिवारी १० वर्षं अ. भा. कॉंग्रेस कमिटीचे सदस्य होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार,हरीयाना या सारख्या विविध राज्यात कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून चोख कामगिरी बजावली आहे, ते पुणे मनपाचे माजी नगरसेवक असून ज्ञान प्रबोधिनी या वॉर्ड मधून निवडून आले होते.माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील यापूर्वी त्यांचेवर कॉंग्रेस पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली होती.विवीध टी. व्ही. न्यूज चॅनेलवरील चर्चेत सहभाग होता. विविध प्रश्नांवर त्यांची अभ्यासपूर्वक मांडणी व पक्षाची बाजू आक्रमकतेने मांडण्यात त्यांची हातोटी असल्यामुळे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची राज्य प्रवक्तेपदी फेरनियुक्ती केली आहे.त्याचबरोबर राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून गोपाळदादा तिवारी यांनी मोदी सरकारची “लोकशाही की खाजगीशाही ” या विषयावर ५ ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केली होती त्यामध्ये विविध मान्यवरांचा सहभाग होता याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
तसेच आ. प्रणिती शिंदे,चारूलता टोकस, हेमलता पाटील, भावना जैन दिलीप एडतकर, निजामुद्दीन राईन, भरत सुरेश सिंह सुधीर ढोणे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे
