Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

भीमा कोरेगाव विजयस्तंभा साठी दिलेल्या निधीमुळे आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण -डॉ. कैलास कदम


पिंपरी : देशातील सर्व आंबेडकरी अनुयायांना कॉंग्रेस नेहमीच न्याय देण्याची भुमिका घेत असते. भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभासाठी देखील महाविकास आघाडी सरकारने भरघोस निधी जाहिर केला आहे. हा दिवस आंबेडकरी जनतेसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. म्हणून आज शहर कॉंग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करीत आहोत. यासाठी भिमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाले यांनी पाठपुरावा केला त्यांचाही उचित गौरव शहर कॉंग्रेसच्या वतीने करताना मला अभिमान वाटत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधीमंडळातील कॉंग्रेसचे गटनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचेही अभिनंदन करीत आहोत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे प्रतिपादन असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि परिसर विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील तीस कोटी रुपयांचा निधी पायाभूत सेवासूविधांसाठी उपलब्ध करुन दिला. यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी पाठपूरावा केला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने डंबाळे यांचा शुक्रवारी पिंपरीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते शाल, पुष्पगूच्छ देऊन आणि पेढे वाटून सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डंबाळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा देऊन सन्मानित केले. राष्ट्रवादी प्रवक्ते फझल शेख, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे तसेच बाबा कांबळे, सुवर्णा डंबाळे, नितीन धोत्रे, गोपाळ मोरे, गंगाताई धेंडे, कविता खराडे, मनिषा गटकळ, सारीका पवार, आशा शिंदे, विमल गायकवाड आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading