पेपरफुटीमुळे विद्यार्थ्याची मानसिकता काय होत असेल ते सरकारला दिसत नाहीत का? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
पुणे : सध्या राज्यात पेपरफुटीचा विषय चर्चेत आहे. आरोग्य विभाग ,म्हाडा विभागाचा ,शिक्षण विभागाचे पेपर फुटले आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाते की काय असे वाटत आहे. त्यावर पेपरफुटीमुळे विद्यार्थ्याची मानसिकता काय होत असेल ते सरकारला दिसत नाहीत का? असा सवाल भाज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आज चंद्रकांत पाटील यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन कार्यक्रमाला भेट दिली. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले,एस टी कर्मचारी असू द्या, शेतकरी असू द्या, विद्यार्थी असू दे सगळ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. असे पाटील म्हणाले राज्य सरकारने 100 प्रश्न अजून सोडवले नाहीत. ते प्रश्न धरले तर सरकार बरखास्त करावे लागेल, परंतु ते घडणार नाही. असे पाटील म्हणाले.
पेपरफुटी प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली. येत्या विधान सभा अधिवेशनात आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार. असेही पाटील म्हणाले.
राज्य सरकार दरवेळेस अधिवेशन मध्ये गोंधळ घालून अधिवेशन होऊ द्यायचे नाही हा राज्य सरकारचा अनुभव आहे. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली. मुळात हिवाळी अधिवेशन होणार का? आणि झाले तर किती दिवसांचे होणार हा ही प्रश्न आहे. असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
