दिलासादायक – सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात व जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा एकही मृत्यू नाही
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या वाढली असून पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 73 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 74 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 81 हजार 14 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 98 हजार 143 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 0 पुणेमहापालिका हद्दीबाहेरील0रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9109 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 862 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 85रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6219
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
