माझी भुमीका थोडयाच दिवसात स्पष्ट करणार – रुपाली पाटील ठोंबरे
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे आणि ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे शहरात मोठे खिंडार पडले आहे. त्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
पक्षात प्रवेश करणार का अश्या चर्चा सुरू झाल्या त्यावर त्यांनी आज मी माझी भुमीका थोडयाच दिवसात स्पष्ट करणार अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत रुपाली पाटील-ठोंबरे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला विजय ठोंबरे पाटील उपस्थित होते.
रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे अशा चर्चा कालपासून चालू आहेत काल मी मुंबईला वैजापूरला माझ्या कामासाठी गेले होते तेव्हा उपमुख्यमंत्री अजित दादा चे शिवसेनेचे नेते वरून देसाई यांची भेट झाली. असे पाटील म्हणाल्या. मी पक्षातल्या काही नेत्यांमुळे मी म्हणते ला राजीनामा दिला आहे. वेळ आली की त्याला पण मी उत्तर देईन असे रूपाली पाटील म्हणाल्या.
पत्रकारांनी त्यांना विचारले तुम्ही आता राज ठाकरे यांना कधी भेटणार नाही का त्यावर त्या म्हणाल्या मी साहेब ठाकरे यांची कधी भेट घेऊ शकते. मनसेचे नेते संदीप देशपांडे हे रूपाली पाटील यांचे
भाऊ असल्यासारखे म्हणले जातात त्यावर पाटील म्हणाल्या, मी त्यांना माझा निर्णय आधीच सांगितला होता व राज ठाकरे ना पण निर्णय आधीच सांगितला होता असे पाटील म्हणाल्या. पत्रकारांनी त्यांना विचारले तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का त्यावर त्या म्हणाल्या अजून माझा काहीच निर्णय झाला नाही असे पाटील म्हणाल्या.
