Jammu and Kashmir- सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद
श्रीनगर : दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मध्ये भ्याड हल्ला केला आहे. श्रीनगरच्या जवळील जेवानमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या बसला लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून 14 जवान गंभीर जखमी झाले आहेत. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पोलिसांनी सांगितले की, श्रीनगरमधील पंथा चौक भागात जेवानजवळ दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला. या हल्ल्यात 12 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एक एएसआय आणि एका सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 6 वाजता जेवान भागात जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलिसांच्या नवव्या बटालियनच्या जवानांना घेऊन जाणारी बस या परिसरात असलेल्या सशस्त्र पोलिस कॉम्प्लेक्सजवळ आली. यादरम्यान अगोदरच दबा धरून बसलेल्या दोन-तीन दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केला. काही कळायच्या आतच दहशतवादी बसवर प्राणघातक हल्ला करून घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
जखमी सैनिकांची नावे – एएसआय गुलाम हसन, कॉन्स्टेबल सज्जाद अहमद, कॉन्स्टेबल रमीझ अहमद, कॉन्स्टेबल बिसंबर दास, संजय कुमार, विकास शर्मा, कॉन्स्टेबल अब्दुल मजीद, कॉन्स्टेबल मुदासीर अहमद, कॉन्स्टेबल रविकांत, कॉन्स्टेबल शौकत अली कॉन्स्टेबल अर्शीद मोहम्मद, सफिक अली, कॉन्स्टेबल सतवीर शर्मा, कॉन्स्टेबल आदिल अली
