उत्तम आरोग्यासाठी रोज व्यायाम करणे हा जीवनाचा गुरुमंत्र – बॉडिबिल्डर साहिल खान
सुप्रसिद्ध बॉडिबिल्डर व अभिनेता साहिल खान (Bodybuilder Sahil Khan) पुण्यातील एफ. सी. रोडवरील असलेल्या एका दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी तो नुकताच पुण्यात आला होता. या प्रसंगी त्याला पाहण्यासाठी तरुणाईने मोठया प्रमाणात गर्दी केली होती. साहिल हा त्याच्या उत्कृष्ट शरीर सौष्ठवमुळे सुपरिचित आहे. अभिनेता, बॉडिबिल्डर आणि मॉडेल म्हणून सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना तो म्हणाला की, बॉडिबिल्डिंग करण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नाही. नियमित न चुकता व्यायाम योग्य आहार योग्य विहार फार महत्त्वाचे आहे. नशैली पदार्थ व चुकीच्या सवयींपासून तरुणांनी दूर राहावे. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, वेळेत झोप घेणे फार गरजेचे आहे.
कोरोनाच्या काळात व लॉकडाउनमध्ये रिकाम्या हातांना काम व व्यायाम करायला अनेकांना जमला नाही. अनेकांनी नैराश्यातून बाहेर येवून नवीन आयुष्याला सुरुवात करावी. उत्तम आरोग्यासाठी रोज व्यायाम करणे हा जीवनाचा गुरुमंत्र आहे.
