हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुण्यतिथी निमित्ता महानगरपालिकेतील त्याच्या प्रतिमेस पुण्यनगरीचे महापौर व उपमहापौरच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पुणे : आज रोजी हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुण्यतिथी (शहिद दिन ) निमित्ताने पुणे महानगरपालिकेतील त्यांचा प्रतिमेस पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ व उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पुणे मनपा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
महापौर मोहोळ म्हणाले,आज हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुण्यतिथी (शहिद दिन ) निमित्ताने त्यांच्या पुतळ्यास हारार्पण करून आम्ही अभिवादन करत आहोत. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुण्यतिथीला पुष्प हार करून विविध कार्यक्रम घेत असतो.
सुनिता वाडेकर म्हणाल्या, आम्ही दर वर्षी हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुण्यतिथी (शहिद दिन ) निमित्ताने त्यांच्या पुतळ्यास हारार्पण करून आम्ही अभिवादन करत आहोत.
