दिलासादायक : आज पुणे शहरात एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही
पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 96 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 85 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 75 हजार 79 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 693 इतके रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9108जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 789 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 82रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5989 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
