Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

अर्बन स्केचर्स पुणेच्या ‘USP05-2021’ या वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन

पुणे  : पुण्याची ओळख, आपल्या वैविध्यपूर्ण चित्र कौशल्याने करून देणाऱ्या ‘अर्बन स्केचर्स पुणे’ या गटाचे वार्षिक प्रदर्शन ‘USP05-2021’ ; दिनांक ९ डिसेंबर रोजी सुरू झाले. सुप्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या चित्रप्रदर्शनात गटातील ६० कलाकारांची १२० आगळी-वेगळी चित्रे प्रदर्शित केली गेली असून, अनेक प्रात्यक्षिके चर्चासत्रे व सादरीकरणे विनामूल्य आयोजित केलेली आहेत.

अर्बन स्केचर्स पुणे हा एक हौशी चित्रकारांचा गट असून दर रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळात पुण्यातील विविध ठिकाणी जमून ते स्केचिंग करतात. गल्लीबोळांपासून ते अनेक नामवंत संस्था, ऐतिहासिक ठिकाणे येथे स्केचिंग करून पुण्याची संस्कृती व सामाजिक जीवन यांच्याशी सौहार्दपूर्ण जवळीक साधणारा हा गट आहे. यात कोणालाही विनामूल्य सहभागी होता येते.

USP05-2021 या प्रदर्शनात प्रख्यात कलाकारांशी संवाद साधण्याची ही अनोखी वार्षिक संधी पुणेकरांसाठी पर्वणी आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाजवळील हातकागद संस्थेमध्ये 
दिनांक १०, ११ व १२ डिसेंबर रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी ,सकाळी १० ते रात्री ७.३० पर्यंत विनामूल्य खुले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading