Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

पादचारी दिना निमित्त शनिवारी लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझा

पुणे: पादचाऱ्यांसाठी शहरात सुरक्षीत वातावरण निर्माण व्हावे यासाठी महापालिकेतर्फे शनिवारी (ता. ११) विविध रस्त्यांवर ‘पादचारी दिना’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ता असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात बंद राहणार आहे. पादचाऱ्यांना या रस्त्यावर मनसोक्त फिरत खरेदी करता येणार आहे. तसेच नागरिकांसाठी विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जाणार आहे. हा रस्ता बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या चारशे मीटरच्या रस्त्यावर खास पादचाऱ्यांसाठी उपक्रम राबविले जाणार असून, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘लक्ष्मी रस्ता ओपन स्ट्रीट मॉल’ याउपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तसेच चालण्याचा आनंद या पुस्तिकेचे प्रकाशन होईल. त्यानंतर या रस्त्यावर पथनाट्य, संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले असून, यामध्ये अनेक संस्थांनी सहभाग घेतला आहे.
लक्ष्मी रस्ता सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत फक्त पादचाऱ्यांसाठी खुला असणार असल्याने या मार्गावरील पीएमपी बससेवा, खासगी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार असून, याच्या नियोजनासाठी पुणे महापालिकेची वाहतूक पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading