Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण : दोषींवर काठोरात कठोर कारवाई केली जाईल – उपमुख्यमंत्री 

पुणे : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारवर सर्वच सत्रातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या पेपरफूटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. एवढी कडक कारवाई केली जाईल की परत कोणी अस करण्याची हिम्मंत करणार नाही.

पेपर रद्द करण्यावर सोमवारी निर्णय 

एमपीएससीला या सगळ्या परीक्षा पुन्हा घेणे अवघड आहे. त्यामुळे या प्रकरणात काय निर्णय घ्यायचा. पेपर रद्द करायचा किंवा पुन्हा पेपर घ्यायचा का? तो ही कधी घ्यायचा? याबाबत निर्णय सोमवारी घेतला जाईल; जेणेकरून प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असेही अजित पवार यांनी आज सांगितले.

बोलतानाही नीट तारतम्य वापरावे

भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातील वाद कोर्टा पर्यंत गेला आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, प्रत्येकाने बोलताना तारतम्य वापरावे. सगळयानी अरे ला कारे करू नये. नीट बोलावे काहीही बोलून वगैरे सामाजिक तेढ निर्माण करू नये. असे अजित पवार म्हणाले.

बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय होईल  

विधान परिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्त्या या अजून झाल्या नाहीत. त्यावर अजित पवार म्हणाले राज्यपाल यावर लवकरच निर्णय घेतील, असे वाटते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading