Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTLatest News

रितेश देशमुख ‘या’ चित्रपटातून करणार दिग्दर्शनात पदार्पण, तर जिनीलिया दिसणार मुख्य भूमिकेत

बॉलीवूडचे एव्हर ग्रीन आणि गोंडस जोडी म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांच्याकडे पाहिले जाते. रीळ लाईफ पासून रीयल लाईफ पर्यंत त्यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. या जोडीने अनेक हीट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. आता रितेश देशमुख ‘वेड’ या मराठी चित्रपटातून  दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या मराठी चित्रपटातून अभिनेत्री जिनीलिया ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  

रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, ’20 वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याच्या मागे उभे राहण्यास तयार झालो आहे. मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे, मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो आहे. या प्रवासाचा एक भाग व्हा, या वेडाचा भाग व्हा.’

 

 

 

जिनिलिया डिसूझा हीने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर पोस्ट शेयर करून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading