स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरसकट पुढे ढकला -चंद्रकांत पाटील
पुणे : ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसीबाबत नाचता येईना अंगण वाकडे, अशी परिस्थिती झाली आहे. पाच वर्षांसाठी ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून बाहेर ठेवण्याचा हा डाव आहे,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच ओबीसीच्या जागा रद्द ठेऊन इतर ठिकाणी निवडणुका घेतल्यास. प्रचंड अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे सरसकट निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 418 जागा निवडून येतील
2024 च्या लोकसभा निवडणुकीत परत भाजप निवडुन येणार का अशी चर्चा सुरू आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2024 च्या निवडणूकित 418 जागा निवडुन येतील असा विश्वास आज व्यक्त केला.
सवाई गंधर्व महोत्सवासाठी 50% उपस्थितीची परवानगी द्या
चंद्रकांत पाटील म्हणाले मी आज पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली ,गेली 2 वर्ष कोरोना संकटाचा सामना करत असताना पुण्यात होणारा सवाई गंधर्व कार्यक्रम होऊ शकला नव्हता मात्र आता कोरोनाचे निर्बंध कमी होत असताना सवाई गंधर्व कार्यक्रम 25% उपस्थितीमध्ये न होता 50% उपस्थितीमध्ये व्हावा यासाठी मी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिलं आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
