महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभाविपची सेवकार्यातून बाबासाहेबांना आदरांजली…!
पुणे:6 डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिन या दिवशी 1956 साली भारताने एक अनमोल हिरा गमावला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणजे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस.
बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य ,समता व बंधुता या मूल्यांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली ७३ वर्षे कार्यरत आहे. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा ,आणि संघर्ष करा’ या तत्वाला अनुसरून अभाविप शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अभाविप या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. पुणे शहरात अभाविपच्या चार भागांमध्ये मिळून ८ कार्यक्रम व ९ प्रतिमापूज व बुद्ध वंदना घेण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालय शाखेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हडपसर व वाघोली नगरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला, पद्मावती येथे विद्यार्थ्यांना व पुस्तकाचे वाटप करण्यात आले तर इतर ठिकाणी संविधानाचे वाचन, दिपवंदना करण्यात आले. बाबासाहेबांना आदरांजली म्हणून पुणे शहरात ९ ठिकाणी प्रतिमापूजन व बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी सर्व ठिकाणी विविध वक्त्यांनी सामाजिक समरसतेचा संदेश दिला. समता म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेली आली तत्वे व विचारांचे प्रतिबिंब तरुणांमध्ये उतरावे व बाबासाहेबांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात तज्ञ बनून भारताला अधिकतम प्रगती व जगातील प्रभावशाली राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील होण्यासाठी अभाविप अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असते असे अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी सांगितले.
